रोबोटिक तंत्रज्ञाना द्वारे गुडघ्याची/ सांध्याची सर्जरी केली असता ,अत्यंत महत्त्वाचा फ़ायदा हा की ती सर्जरी अत्यंत अचुकतेने करू शकतो. जितकी सर्जरीतील अचुकता जास्त , तितकेच बदललेल्या सांध्याचे आयुष्यमान देखिल जास्त .ही सर्जरी करताना छोटासा ‘इन्सिजन’ किंवा छोटासा छेद घेवुन ही शस्त्रक्रिया करता येते. त्याच्या मुळे पेशंटला रक्तस्राव फारच कमी होताे .त्याच बरोबर अनावश्यक भाग ‘बर्’ च्या साहाय्याने क़ाढला गेल्यामुळे पेशंट ला सर्जरी नंतर वेदना जवळ-जवळ होतच नाहीत.याला ‘वेदना विरहित ‘ सर्जरी म्हणता येइल. बदललेला सांधा अत्यंत अचुकतेने बसवला गेल्यामुळे सांध्याच्या भोवताली जे लिगामेंट्स असतात त्यांचा वरती कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण येत नाही.
‘Balancing of ligaments ‘ म्हणजे गुडघ्याच्या दोन्ही बाजूला आणि आत मधे जे लिगामेंट्स असतात ते जसे नैसर्गिक आहेत त्याच प्रकारे सर्जरी नंतर जर आपण ठेवु शकलो ,तर पेशंट ला सर्जरी नंतरच्या हालचाली अत्यंत सहजतेने करता येतात. त्यामुळे पेशंट च्या मनात आपल्या शरीरात कृत्रिम सांधेरोपण झाले आहें अशी भावना निर्माण होत नाही. ‘रोबोटिक सर्जरी तील अचुकता ‘ हे साध्य करण्यास अधिक उपयाेगी ठरते.सर्व हालचाली अत्यंत नैसर्गिक रित्या होतात. उठणे, बसणे, चालणे, जीना चढ़णे-उतरणे ह्या गोष्टि पहिल्या आठवडयातच पेशंट सहजतेने करू शकतो. म्हणून पारंपारिक सर्जरी पेक्षा रोबोटिक सर्जरीतले फ़ायदे अधिक आहेत असे म्हणता येते.
knee रिप्लेसमेंट सर्जरी नंतर पेशंटला साधारणपणे एक ते दिड़ आठवडा वॉकर वापरण्यास सांगण्यात येई. त्यानंतर स्टिक सपोर्ट आणि त्यानंतर without सपोर्ट चालण्यास शिकविले जाई. परंतु रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर पेशंट ला पहिल्या २,३ दिवसातच कुठल्याही आधारा शिवाय चालणं सहज शक्य होत .
हा एक मोठा फ़ायदा ‘ रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी’ नंतर पेशंट ला मिळतो. सर्जरी तील अचुकता व सर्जरी नंतर त्याला फ़ायदेशीर ठरणारे असे हे तंत्रज्ञान हे एक वरदानच आहे .
डाॅ ह्रषिकेश सराफ
जाॅइंट्स क्लिनिक, कर्वे राेड , पूणे
९८२३३९८०३३
शाश्वत हाॅस्पिटल,काेथरूड, पूणे
०२०६७२९६६१३